प्रशासकीय संरचना

जबाबदारी आणि भूमिका
जबाबदारी
ग्रामपंचायतीच्या सर्व बैठकींचे अध्यक्षस्थान भूषविणे. पंचायतचे ठराव मंजूर करून घेणे आणि त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे. ग्रामपंचायतीच्या निधीचा योग्य व पारदर्शक वापर करणे. शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे. ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, आणि इतर मूलभूत सोयींबाबत निर्णय घेणे. ग्रामसभांमध्ये नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यावर उपाययोजना करणे. उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी समन्वय ठेवून कामकाज चालवणे.
भूमिका
ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून सरपंच हा गावाच्या विकासाचा नेता असतो. ग्रामपंचायतीच्या सर्व कामकाजाचे नेतृत्व करणे, ग्रामस्थांमध्ये एकता राखणे आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणे ही सरपंचाची मुख्य भूमिका असते.
जबाबदारी
सरपंच अनुपस्थित असल्यास बैठका अध्यक्ष म्हणून घेणे. ग्रामपंचायतीच्या ठरावांची व योजनांची अंमलबजावणी करण्यात सहकार्य करणे. विविध समित्यांवर सदस्य म्हणून कार्य करणे व ग्रामस्थांच्या समस्यांकडे लक्ष देणे. सरपंचास विकासकामांसाठी सूचना व सहाय्य करणे. ग्रामपंचायतीतील अधिकारी व सदस्यांमधील समन्वय राखणे. पंचायत निधी व नोंदींच्या देखरेखीत मदत करणे.
भूमिका
ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून सरपंच हा गावाच्या विकासाचा नेता असतो. ग्रामपंचायतीच्या सर्व कामकाजाचे नेतृत्व करणे, ग्रामस्थांमध्ये एकता राखणे आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणे ही सरपंचाची मुख्य भूमिका असते.
जबाबदारी
ग्रामपंचायतीची सर्व प्रशासकीय कामे नियमित ठेवणे. उत्पन्न आणि खर्चाची नोंद ठेवणे व वार्षिक अहवाल तयार करणे. ग्रामपंचायतीच्या बैठकींचे अजेंडे तयार करणे व बैठकींची नोंद ठेवणे. कर व महसूल वसूल करणे. विविध शासकीय योजना जसे मनरेगा, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन इत्यादींची अंमलबजावणी करणे. ग्रामस्थांना आवश्यक कागदपत्रे (जन्म, मृत्यू दाखले इ.) पुरवणे. सरपंच व उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासाची कामे करणे. शासनाशी पत्रव्यवहार आणि अहवाल सादर करणे.
भूमिका
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा शासकीय प्रतिनिधी व प्रशासकीय प्रमुख असतो. पंचायतचे दैनंदिन कामकाज, नोंदी, लेखा व शासन योजनांची अंमलबजावणी करणे हे त्याचे मुख्य कार्य असते.