आमच्या बद्दल

"झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा"

बोर्डी गाव

  • बोर्डी हे महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिमेकडील किनाऱ्यावरील गाव आहे. पालघर जिल्ह्याचे डहाणू तालुक्याचे हद्दीत येणारे.
  • स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यलढा आणि शिक्षण या दोन्ही कार्यात येथील समाज सुधारणांनी फार मोठे योगदान दिले. आचार्य भिसे गुरुजी, वित्रे गुरुजी, ताराबाई मोडक यांच्या व्यक्तित्वाचे पावित्र्य या गावावर कायम शालीसारखे पांघरलेले आहे. आजही बोर्डीमध्ये भरपूर शाळा व वस्तीगृहे असून दूरवरून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येऊन राहतात.
  • बोर्डी गावाची दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे एक शेतीप्रधान गाव आहे. आपल्या 'वाडी' वर म्हणजे शेती फळबागांवर निरतिशय प्रेम करणारे इथले लोक विकूच्या हमखास उत्पन्नामुळे सुखी आहेत. शेतीमध्ये प्रयोग करून नाविन्य आणण्याची वृत्तीही अनेकांत आढळते. चिकू, लिची, नारळ, भात, भाज्या व फुले ही पिके प्राधान्याने घेतली जातात.

बोर्डी गावाला स्वातंत्र्यसंग्रामाची मोठी पार्श्वभूमी आहे. बोर्डीत जवळपास 90 च्या वर स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. देश सेवेची मोठी परंपरा बोर्डी गावास आहे. बोर्डी अनेक महापुरुषांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झाले आहे. राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी, भारताचे प्रथम राष्ट्रपती माननीय बाबू राजेंद्र प्रसाद, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी आनंद व इतर अनेक लोकांनी बोर्डीस येऊन कौतुक केले आहे.

आपल्या देशातील बालवाडी व अंगणवाडीच्या जनक कै. ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात बोर्डीतूनच केली. असा ह्या बोर्डी गावात सन 1960 साली प्रथम ग्रामपंचायतची स्थापना झाली. झालेला प्रत्येक सरपंचाने व समितीने बोर्डीच्या विकासाची कामे अगदी मनापासून केली त्यात पाणी अडवा पाणी जिरवा सारखे मोहीम, बोर्डीतील उपनद्यांना बंधारे बांधून शब्द दिले जात आहे. सन 1993 यावर्षी महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्राम अभियान पुरस्कार मिळाला होता. तसेच 1994 साली यशवंतराव प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा बाळासाहेब खेर यांचे नावाने आदर्श गावासाठीचा पुरस्कार देखील प्राप्त झाला होता.

बोर्डीला लाभलेल्या जवळपास पाच कि.मी समुद्रकिनाऱ्यावर एक लाखांचे आसपास सुरुची झाडे लावल्याने महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार 1996 साली दिला गेला. 2024 25 ह्या वर्षात शासन निधी आणि लोक वर्गणीतून जवळपास दहा लाख रुपये खर्चून अत्याधुनिक स्मशानभूमीची निर्मिती केली आहे. गावाच्या सांस्कृतिक व क्रीडा संवर्धन व विकासासाठी कै. मदनराव सावे क्रीडांगण तसेच एस. आर. सावे क्रीडा संकूल, नाना मळेकर व्यायाम शाळा याची योग्य देखभाल करून जनतेस सर्व सुविधा पंचायतीतर्फे उपलब्ध करून देण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क व खुली व्यायाम शाळा याची देखील व्यवस्था पंचायतीतर्फे करण्यात येते. दरवर्षी दसऱ्यानिमित्त लहान मोठ्यांसाठी अनेक प्रकारची क्रीडा स्पर्धा भरविण्यात येतात तसेच विजयादशमीबद्दल समारंभ व ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन भरविण्यात येते.गावातील उपलब्ध सर्व तलावांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. गावात स्वच्छता अभियान कटाक्षाने राबविले जाते. त्याबाबत ग्रामस्थांना जागृत करून नियमितपणे घंटागाडी गावभर फिरून कचरा गोळा करून त्याची वर्गवारी करून योग्य विल्हेवाट लावली जाते.

जनतेच्या सोयीसाठी गावात स्वच्छतागृहे बांधले आहेत. शासकीय अनुदान तसेच ग्रामस्थांच्या सहभागाने पाणीपुरवठा योजना अमलात आणली आहे. काही ठिकाणी सार्वजनिक नळ पंचायतीतर्फे पुरविण्यात आले आहेत. दर शनिवारी गावात आठवडा बाजाराचे आयोजन केले जाते त्यात खरेदी व विक्रीसाठी आसपासच्या गावातील ग्रामस्थ देखील येतात. जनता व शेतकऱ्यांसाठी गावात सहकारी तत्त्वावर चालणारे ग्राहक भांडार असून तेथून जनतेला स्वस्त धान्य, रेशन, खते बियाणे उपलब्ध करून दिले जाते. गावात पूर्णपणे महिलांनी चालवलेली पतपेढी असून गरजूंना तिचा उपयोग होतो. पंचायतीतर्फे घरकुल योजने अंतर्गत अनेक रहिवासांना स्वतःचे घर मिळाले आहे.

या भागातील संपन्न समाज म्हणजे येथे फार पूर्वीपासून वसलेले पारशी, इराणी लोक होते. त्यांच्याकडून चिकू लागवडीचे तंत्र अवगत केल्यानंतर वाडवळ समाजावेही लोक हळूहळू संपन्न होत गेले. समाजाच्या इतर घटकांत जैन धर्मीय, इस्लाम धर्मीय, हिंदू धर्मीय जातीचे लोक आणि दुबळा, धोडी, वारली हे आदिवासी आहेत.

लोकसंख्या

कुटूंब संख्या

महसूल गाव

वार्ड

क्षेत्रफळ(चौ.किमी)

जि.प.शाळा

अंगणवाडी

महत्वाचे संपर्क क्रमांक

१५५३००

नागरिक संपर्क केंद्र

१०९८

बाल हेल्पलाईन

१०९१

महिला हेल्पलाईन

१०९०

गोपनीय गुन्हा तक्रार

११२

आपत्कालीन हेल्पलाईन

१००

पोलिस हेल्पलाईन